जगातील सर्वच देशांना दहशतवाद्यांच्या कारवायांची झळ पोहोचली आहे. देशांच्या सीमा ओलांडून दहशतवादी कारवाया घडत आहेत. विशेष म्हणजे दहशतवाद्यांच्या स्रोतामध्ये वाढ झाली असून, काही देशही दहशतवाद्यांना रसद पुरविताना दिसून येतात. परस्परांमधील संपर्क वाढवितानाच, वित्तपुरवठा, शस्त्रास्त्र पुरवठा या दृष्टीने वेगवेगळ्या स्रोतांकडून मदत मिळविण्यात दहशतवादी यशस्वी झाले आहेत. ‘आयसिस’चा उदय आणि धोक्याचा विचार करताना, त्याच्या उदयाची पार्श्वभूमीही महत्त्वाची ठरते. पश्चिम आशियातील गुंतागुंतीचे हितसंबंध आणि परस्परांमधील वैमनस्य यातून ‘आयसिस’ चा उदय झाला आहे. ‘सौदी अरेबियासह काही अरब देशांनी बेलाशकपणे आयसिसला मदत केली. या दहशतवाद्यांना मुबलक पैसा, शस्त्रास्त्रे दिली. या संघटनेकडे जाणाऱ्या तरुणांकडे दुर्लक्ष केले. यामध्ये अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांचाही समावेश आहे. अशा या गुंतागुंतीतून निर्माण झालेला हा भस्मासूर आता जगाच्या सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.
आयसिसचा उद्रेक आणि त्याचे महाराष्ट्रातील परिणाम
₹60.00
Close
Price Summary
- ₹60.00
- ₹60.00
- ₹60.00
In Stock
Estimated Delivery:
24 December - 26 December
25 People viewing this book right now!
Additional information
Author | मधुबन पिंगळे |
---|---|
Language | मराठी |
Pages | 150 |