कोणतीही संघटना उभी करणं हे एक शास्त्र आहे. संघटनेसाठी तन-मन-धन अर्पण करणा-या अनुयायांचा समुदाय तर लागतोच , पण तेवढ्याने संघटना उभी राहत नाही आणि दीर्घकाळ टिकतही नाही. शिवाय कोणत्याही संघटनेची वैचारिक बैठक आधी कार्यकर्त्यांमध्ये आणि नंतर समाजामध्ये रुजण्यासाठी काही कार्यक्रम देण्याचीही आवश्यकता असते. त्यामुळे उभं केलेलं काम निरंतर टिकवायचं असेल तर संघटना शास्त्राचे धडे घ्यावेच लागतात. हे संघटनशास्त्र म्हणजे नेमकं काय याबाबत सैध्दांतिक आणि व्यावहारिक चर्चा करणारे लेख या संग्रहात आहेत. व्यवस्थापन, लोकलढे अणि प्रकल्प यासंदर्भात संघटनाशास्त्राचे पैलू कसे उपयुक्त ठरतात हे स्पष्ट करण्याचाही प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामी, महात्मा गांधी आणि गोळवलकर गुरुजी यांची संघटन कुशलता स्पष्ट करणारे लेख हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं. ज्येष्ठ संघ प्रचारक कै. यशवंतराव केळकर आणि कै. शिवरायजी तेलंग, ख्यातनाम विचारवंत कै. नरहर कुरुंदकर, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्र. वा. रेगे, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, गांधीवादी विचारवंत श्रीपाद जोशी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुध्दे यांच्या लेखांनी हे पुस्तक सजले आहे.
संघटनशास्त्र
₹150.00
Close
Price Summary
- ₹150.00
- ₹150.00
- ₹150.00
In Stock
Estimated Delivery:
23 January - 25 January
20 People viewing this book right now!
Additional information
Author | डॉ. विनय सहस्रबुध्दे |
---|---|
Language | मराठी |
Pages | 148 |