भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी अल्पावधीत साऱ्या देशाला स्तिमित केलं होतं. त्यांचा मृत्यु सगळ्यांनाच चटका लावून गेला. महाजन यांच्या नेतृत्त्वाच्या विविध पैलुंचं प्रत्ययकारी दर्शन घडविणारं हे पुस्तक. प्रभावी वक्ता, अभ्यासू संसदपटू, कुशल संघटक, मुत्सद्दी राजकारणी आणि विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणून प्रमोद महाजनांची ओळख आहे. राजकारणाच्या धकाधकीतही रसिकता जोपासणारे प्रमोद महाजन स्वभावाने हळवे आणि दिलदार होते. प्रमोदजींची गाजलेली भाषणे, त्यांच्या काही मुलाखती, त्यांच्या कुटुंबियांनी आणि परिचितांनी लिहिलेल्या आठवणी, मान्यवरांनी वाहिलेली श्रध्दांजली यांचा समावेश या पुस्तकात आहे.सकाळी दिल्लीत पंतप्रधानांबरोबर नाष्टा घेउन चेन्नईत जयललितांबरोबर दुपारचं जेवण घेउन रात्रीचं जेवण मुंबईत अंबानींबरोबर घेऊ शकणारा नेता “हे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केलेलं वर्णन महाजनांच्या व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ परिचय करून देणारं आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रस्तावना, भाषणकलेवरचं प्रमोदजींचं सुंदर भाषण, राजू परुळेकर यांनी घेतलेली त्यांची प्रदीर्घ मुलाखत, रेखा महाजन यांचा हृदयस्पर्शी लेख, अरूण जेटली, करण थापर, बाळ आपटे, विनय सहस्रबुध्दे यांच्या आठवणी आणि प्रमोदजींच्या मृत्युनंतर विविध वृत्तपत्रात प्रसिध्द झालेले अग्रलेख यांच्या समावेशामुळे हे पुस्तक संग्राह्य झाले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुध्दे आणि कार्यकारी संचालक रवींद्र साठे या संपादकद्वयाने तन्मयतेने हा मनोज्ञ गोफ गुंफला आहे.
प्रमोद महाजन – दूरदर्शी नेतृत्त्व
₹200.00
Close
Price Summary
- ₹200.00
- ₹200.00
- ₹200.00
Out of Stock
Highlights:
Author: लालकृष्ण आडवाणी
Estimated Delivery:
23 January - 25 January
25 People viewing this book right now!
Additional information
Author | लालकृष्ण आडवाणी |
---|---|
Language | मराठी |
Pages | २६८ |